36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 PM | 19 August 2021

| Updated on: Aug 19, 2021 | 9:37 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे खराब हवामानामुळे पालघरला (Palghar) जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी (Palghar collector) इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे खराब हवामानामुळे पालघरला (Palghar) जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी (Palghar collector) इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाले.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 19 August 2021
Pune | पोलीस व्हेरीफिकेश मिळत नसल्याने पुण्यात सुरेश पिंगळे यांचं टोकाचं पाऊल