36 जिल्हे 72 बातम्या | 8:30 AM | 27 July 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. यासह महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील 72 बातम्यांवर वेगवान दृष्टीक्षेप टाकणारं बुलेटिन 36 जिल्हे 72 बातम्या
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असल्याने कोल्हापुरातील सखल भागात साचलेले पाणी आता ओसरायला सुरुवात झालीय. मात्र पाणी ओसरल्यानंतर आता पूरग्रस्त भागात चिखल, कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पाणी ओसरल्यानंतर घरांची तसेच दुकानाची स्वच्छता करण्यासाठी स्थानिक नागरिकांची धडपड सुरू आहे. 2019 पेक्षा हे पाण्याची पातळी यावे अधिक असल्याने शेकडो लोकांच्या प्रापंचिक साहित्य नुकसान झालंय. शिवाय पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला कचरा देखील अडकून पडला