जालन्यात आधी दगडफेक झाली की लाठीचार्ज? 4 तारखांना ४ वेगळे दावे? देवेंद्र फडणवीस यांचा कोणता दावा खरा?

| Updated on: Dec 10, 2023 | 11:37 AM

ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्यावर देवेंद्र फडणवीसांनी चार वेगवेगळे दावे केल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस यांनी केलेल्या या चारही दाव्यात त्यांची भूमिका वेगवेगळी दिसतेय. त्यामुळे कोणता दावा खरा? असा सवाल केला जातोय उपस्थित

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : जालना लाठीचार्जबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही वातावरण शांत करण्यासाठी होती, असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. तर जालन्यात आधी पोलिसांवर दगडफेक झाली की आधी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला? यासंदर्भात फडणवीसांनी लेखी उत्तर दिलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी घेतलेली आणि आता घेतलेल्या भूमिकेत विसंगती असल्याचे विरोधकांनी म्हटलंय. सभागृहातील लेखी उत्तरात फडणवीस यांनी जालन्यात पोलिसांनी बचावात्मक लाठीचार्ज केल्याचे म्हटले. या लेखी उत्तराचा दाखला देत भुजबळ यांनी पुन्हा जालन्यातील तो मुद्दा बाहेर काढला. दुसरीकडे ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्यावर देवेंद्र फडणवीसांनी चार वेगवेगळे दावे केल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस यांनी केलेल्या या चारही दाव्यात त्यांची भूमिका वेगवेगळी दिसतेय. त्यामुळे कोणता दावा खरा? असा सवालच उपस्थित केला जातोय.

Published on: Dec 10, 2023 11:37 AM