4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 3 November 2021

| Updated on: Nov 03, 2021 | 1:53 PM

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. 

अमरावती: माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे.  निंबुरकर मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले.

नेमकं प्रकरण काय?

कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीतर गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. प्रमोद निंबुरकर यांच्या पत्नीला प्रशासनानं काम द्यावं, असं अनिल बोंडे म्हणाले. प्रशासनाच्या चुकीमुळं निंबुरकर यांचा जीव गेलाय,असं बोंडे म्हणाले. तिवसा मतदारसंघाच्या आमदार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निंबुरकर यांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी जायला हवं होतं. मात्र, ते जमत नसेल तर किमान त्यांच्या पत्नीला काम द्यावं, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

Published on: Nov 03, 2021 01:53 PM
कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
किरीट सोमय्यांविरोधात 1 रुपयाचा मानहानीचा दावा करणार,अतुल लोंढे यांची आक्रमक भूमिका