4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 November 2021
देवेंद्र फडणवीस दावा करतात की ही जागा आम्ही सलीम पटेलकडून विकत घेतली. तर 2005 साली ते इथे 400 लोकांकडून भाडे वसूल करत होते. आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत. सलीम पटेल हे आमचे त्या काळातील जागामालक होते. हे सगळे साल 2007 ला दोषी आढळून आले आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा व्यवहार 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि समील पटेल यांच्याकजून फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केल्याचे पुरावेच फडणवीसांनी दाखवले आहेत. त्याबाबत विचारलं असता, नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचं सांगत फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडणवीस दावा करतात की ही जागा आम्ही सलीम पटेलकडून विकत घेतली. तर 2005 साली ते इथे 400 लोकांकडून भाडे वसूल करत होते. आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत. सलीम पटेल हे आमचे त्या काळातील जागामालक होते. हे सगळे साल 2007 ला दोषी आढळून आले आहेत. शाह वली खान अंजरवर्ल्डसाठी काम करतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. रेडी रेकनरच्या दराने ही जागा विकत घेतली. इथे तिनशे भाडेकरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात. काही घरं अनधिकृतही आहेत. पण आम्ही त्यांना त्रास देत नाहीत, असं फराज मलिक यांनी म्हटलंय.