4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 July 2021
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना दिलं तर जबाबदारीने ते सांभाळू शकतील, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.
शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना दिलं तर जबाबदारीने ते सांभाळू शकतील, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.
शनिवारी थोरात नगर दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विधानसभा अध्यक्ष पदावरुन थोरात यांना प्रश्न विचारला. यावेळी भास्कर जाधव यांचं म्हणणं खोडून काढत, “त्यांनी कामगिरी चांगली केली परंतु काँग्रेसकडेही असे भास्कर जाधव आहेत… जाधवांना अध्यक्षपद देण्यासंबंधी कोणताही विचार झालेला, आमची तशी चर्चाही झाला नाही”, असं म्हणत त्यांनी जाधवांचा दावा खोडून काढला.