4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM
देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जात आहे. 12 तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.