4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 2 September 2021

| Updated on: Sep 02, 2021 | 7:44 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय. चतुर्वेदी यांची सीबीआयने काळी काळ चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय. चतुर्वेदी यांची सीबीआयने काळी काळ चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते. त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांच्या वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण 10 ते 12 जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केलाय. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीन चिट दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, देशमुख प्रकरणात अद्याप चौकशी सुरु असल्याचं सीबीआयकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, सीबीआयचा एक अहवालही त्यावेळी समोर आला होता. या अहवाल प्रकरणात सीबीआयने चतुर्वेदी यांना आणि देशमुखांच्या वकिलांना ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, जवळपास अर्धा तास चौकशी करुन चतुर्वेदी यांना सीबीआयनं सोडून दिल्याचंही कळतंय.

Published on: Sep 02, 2021 07:44 AM
Raju Shetti | राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचाय तो घ्या, मला काहीही फरक पडत नाही : राजू शेट्टी
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 September 2021