4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 20 August 2021

| Updated on: Aug 20, 2021 | 8:06 AM

या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.

संबंधित वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, “काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात.”

Raigad | म्हाडाची घरे ग्रामीण भागातील कुटुंबाना कशी चालणार? आमदार भरत गोगावलेंचा सवाल
Gopichand Padalkar | बैलगाडा मालकांना जात-पात, धर्म, भेद, पक्ष-पार्टी काही नाही : गोपीचंद पडळकर