4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 26 August 2021-TV9
राज्याचं राजकारण केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंमुळे ढवळून निघालंय. नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर त्यांची अटक होऊन सुटकाही झाली. नारायण राणेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?
राज्याचं राजकारण केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंमुळे ढवळून निघालंय. नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर त्यांची अटक होऊन सुटकाही झाली. नारायण राणेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, शिवसेनेत सगळेच मंत्री गँगस्टर आहेत का?, असा थेट सवाल नारायण राणेंनी शिवसेनेला विचारलाय.
सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.