4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 30 August 2021

| Updated on: Aug 30, 2021 | 8:20 AM

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ed notice) बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला परब यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ed notice) बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला परब यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. “आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही कशालाही घाबरत नाही. ही सगळी लढाई कायद्यानेच लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत.

“काल रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. जनआशीर्वाद यात्रा संपली आणि ताबडतोब या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं. ईडीचं. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे. आम्ही काय कुणाला धमक्या देणार नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं कायदेशीर लढाया लढतात आणि जे असत्य आहे, जे बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही बनावट नाही. तुम्ही हे सर्व आमच्यावर लादत आहात,” असं रोखठोक भाष्य राऊत यांनी केलंय.

Published on: Aug 30, 2021 08:20 AM
Special Report | देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात?
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2021