4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 31 August 2021

| Updated on: Aug 31, 2021 | 7:44 AM

हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे.

महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे चक्क तुटून पडली आहेत. तर हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत काही फेरीवले फिरत होतो. याच भागातील कासारवडवली नाक्यावर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारावाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या माथेफिरु फेरीवाल्याने पिंपळे यांच्यावर चाकूने अचानकपणे हल्ला केला.

Published on: Aug 31, 2021 07:44 AM
Special Report | भारतात कोरोनाची तिसरी लाट?
Thane Dahihandi | ठाण्यात नियमांची पायमल्ली, वर्तकनगरमध्ये मनसेने दहीहंडी फोडली