4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 31 July 2021

| Updated on: Jul 31, 2021 | 8:36 AM

राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गणपतराव देशमुख हे आपल्या सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व शेवटपर्यंत करत राहीले. शेकापच्या नेत्यांसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केलीय. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आम्ही आणि मतदारसंघ आज पोरका झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एक पक्ष, एक व्यक्ती, एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुखांमुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली होती.. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झाले होते. ते विधानसभेत तब्बल 50 वर्षे राहिले आहेत. राज्यातील विधानसभेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. या काळात मुख्यमंत्रीपदाची संधीही त्यांना चालून आली होती. काय होता हा किस्सा? या सर्वांचा घेतलेला हा आढावा.

Published on: Jul 31, 2021 08:36 AM
Hingoli Fire | आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना आग, दुकानातील माल जळून खाक
Ganpatrao Deshmukh Funeral | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल