4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM
जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याच स्पष्ट झालं आहे. भारतातही ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याच स्पष्ट झालं आहे. भारतातही ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.