4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 6 November 2021

| Updated on: Nov 06, 2021 | 8:36 AM

अनिल देशमुख यांना मुंबईतील ईडी कार्यालयात ऋपिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. मात्र, ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नसून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. ईडीनं 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात चांदीवाल आयोगासमोर कोणतेही पुरावे द्यायचे नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, ते हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल.

अनिल देशमुख यांना मुंबईतील ईडी कार्यालयात ऋपिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. मात्र, ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नसून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीय.

Published on: Nov 06, 2021 08:36 AM
Special Report | पेट्रोलच्या दर कपातीवरून शरद पवारांची ‘गुगली’
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 November 2021