4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 August 2021
मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवणार आहेत. त्यादृष्टीने मनसेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.