4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 September 2021

| Updated on: Sep 07, 2021 | 8:21 AM

भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोलंदाजी केली आणि भारताला दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. इंग्लंडने सकाळच्या सत्रात 27 षटकात दोन विकेटच्या बदल्यात 54 धावा बनवल्या. तर दुसऱ्या सत्रात 25.1 षटकात 62 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या.

विराट सेनेनं अर्थात भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) इंग्लंडमध्ये इतिहास रचलाय. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी पराभव केलाय. विजयासाठी आवश्यक असलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सामन्याच्या अखेरच्या दिवशी 209 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोलंदाजी केली आणि भारताला दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. इंग्लंडने सकाळच्या सत्रात 27 षटकात दोन विकेटच्या बदल्यात 54 धावा बनवल्या. तर दुसऱ्या सत्रात 25.1 षटकात 62 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या.

भारताकडून उमेश यादवने 3, तर बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. भारतीय संघानं ओव्हलमध्ये 50 वर्षानंतर विजय संपादन केलाय. या विजयासह भारतीय संघानं कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. शेवटचा सामना 10 सप्टेंबरला मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जामार आहे. भारताने 35 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एक सीरीजमध्ये 2 सामने जिंकले आहेत. भारतानं कपिल देव यांच्या नेृत्वाखाली 1986 मध्ये इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेत 2 सामन्यात विजय मिळवला होता.

Published on: Sep 07, 2021 08:21 AM
Special Report | मारहाणीची सुरुवात महिला सरपंचाकडूनच?
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, अनेक सखल भागांमध्ये साचले पाणी