4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 23 August 2021
अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे.
अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे. हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. आम्ही ताकदीने किंवा चर्चेद्वारे पंजशीरची समस्या सोडवू, असं तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम म्हणालेत. काबूलच्या उत्तरेस स्थित पंजशीर घाटी ही तालिबानविरोधी शक्तींचा प्रमुख गड आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तालिबानने तेथे आक्रमण केले आणि जबरदस्तीने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथले जमलेले सशस्त्र गट योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात.