4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 8 August 2021

| Updated on: Aug 08, 2021 | 8:01 AM

सुवर्ण पदकावर नाव कोरल्यानंतर आता नीरजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑलिम्पिक पदक वितरणादरम्यान तिरंगा उंचावण्यात आला. त्यावेळी राष्ट्रगीत सुरु असताना नीरज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रगीत पूर्ण झाल्यानंतर मैदानात ‘भारत माता की जय’चा एकच नाद घुमला.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वत:सह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. सुवर्ण पदकावर नाव कोरल्यानंतर आता नीरजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑलिम्पिक पदक वितरणादरम्यान तिरंगा उंचावण्यात आला. त्यावेळी राष्ट्रगीत सुरु असताना नीरज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रगीत पूर्ण झाल्यानंतर मैदानात ‘भारत माता की जय’चा एकच नाद घुमला. नीरजचा हाच व्हिडीओ लाखो लोकांकडून आता शेअर करण्यात येत आहे.

भालाफेकीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. फायनलमध्ये तो अशीच दमदारी कामगिरी करुन, आज तो पदक मिळवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. नीरज चोप्रानं तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. तर, नीरज चोप्राचा चौथा थ्रो फाऊल ठरला. नीरजनं टाकलेला पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला आहे. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर थ्रो फेकला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

Published on: Aug 08, 2021 08:01 AM
Special Report | नीरज चोप्रा….भारताचा ‘गोल्डन बॉय’
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 August 2021