4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 8 November 2021
कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत सेलिब्रिटी आणि मंत्र्यांचा मुलांना अडकवण्याचा कट काशिफ खान याने आखला होता. या पार्टीला येण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही गळ घालण्यात आली होती. मात्र, अस्लम शेख या पार्टीला गेले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत पुन्हा एकदा काशिफ खान या ड्रग्ज पेडलरचा उल्लेख केला. क्रुझ पार्टीत काशिफ खानही उपस्थित होता. नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड आहे. काशिफ खान हा त्याचा मालक आहे. नमास्क्रेच्या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं असं सांगितलं जाते.