4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 1 September 2021
हे सरकार हिंदूविरोधी नाही, कोणत्याही सणांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचं पालन करावंच लागेल' अशी ताकीद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
‘दहीहंडीचा उत्सव आणि उत्साह याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचं संकट जगभर पसरलं आहे. हे संकट समोर दिसत असतानाही काही लोकांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे घाणेरडं राजकारण आहे. हे सरकार हिंदूविरोधी नाही, कोणत्याही सणांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचं पालन करावंच लागेल’ अशी ताकीद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले. मिरा-भाईंदर येथील पहिल्या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री बोलत होते