4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 15 September 2021

| Updated on: Sep 15, 2021 | 7:54 AM

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

Published on: Sep 15, 2021 07:54 AM
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 September 2021