4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 24 September 2021
असंच काम करत राहिलात तर धोतरं पेटतील असा इशारा देत कालच्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर जळजळीत टीका करण्यात आली होती. पण काल राज्यपाल महोदयांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी करुन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर 12 तासांच्या आत संजय राऊतांनी आजच्या अग्रलेखातून राज्यपालांचे आभार मानले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच्या सामना अग्रलेखातून राज्यपालांना मदमस्त हत्तींची उपमा देत असंच काम करत राहिलात तर धोतरं पेटतील असा इशारा देत त्यांच्यावर जळजळीत टीका केली होती. पण काल राज्यपाल महोदयांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी करुन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर 12 तासांच्या आत राऊतांनी अग्रलेख लिहून राज्यपाल महोदयांचे आभार मानले आहेत.
ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेला सुधारित अध्यादेश आणि त्यावर राज्यपालांनी आता उठवलेली मोहोर ही मोठीच सकारात्मक घडामोड म्हणायला हवी. सरकार आणि राजभवन भविष्यातही असेच परस्परपूरक काम करत राहिले तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच आहे. अध्यादेशावरील स्वाक्षरीबद्दल राज्यपालांचे आभार मानलेच पाहिजेत, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.