VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 April 2022
दादरच्या शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा सुरू केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसेच्या रथावरील भोंगेही जप्त केले आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन पोलीस ठाण्याखालील मंदिराजवळ हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोत्रचे पठण सुरू केले आहे.
दादरच्या शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा सुरू केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसेच्या रथावरील भोंगेही जप्त केले आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन पोलीस ठाण्याखालील मंदिराजवळ हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोत्रचे पठण सुरू केले आहे. मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे पोलीसही हैरान झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही. शिवसेना भवन हे काही मुस्लिमांचं स्थळ नाही. हिंदुत्ववाद्यांचं कार्यालय आहे. त्यामुळे तिथे हनुमान चालिसा म्हटलं तर बिघडलं कुठं? असा सवाल मनसेने केला आहे. जोपर्यंत आमच्या सहकाऱ्यांना सोडलं जात नाही, तोपर्यंत आमचं हनुमान चालिसा पठण सुरूच राहील असा इशाराही मनसेने दिला आहे.