VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 March 2022
शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी खोचक टीका भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जालन्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासात हाती येतील. सुरुवातीचे कौल पाहता या दोन्ही राज्यांमध्ये शिवसेना सपशेल आपटल्याचे चित्र आहे.
शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी खोचक टीका भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जालन्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासात हाती येतील. सुरुवातीचे कौल पाहता या दोन्ही राज्यांमध्ये शिवसेना सपशेल आपटल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेनेने नशीब आजमावले. याआधीही शिवसेनेने असे प्रयोग केले आहेत. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.