VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 13 August 2022
एकनाथ शिंदे गटाने एक मोठी घोषणा केलीयं. मुंबईमध्ये आता सेना भवन बांधण्यात येणार असल्याचे काल सांगण्यात आले. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, आता मुंबईनंतर पुण्यात देखील शिवसेना भवन बांधण्याच्या तयारीला वेग आलायं.
एकनाथ शिंदे गटाने एक मोठी घोषणा केलीयं. मुंबईमध्ये आता सेना भवन बांधण्यात येणार असल्याचे काल सांगण्यात आले. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, आता मुंबईनंतर पुण्यात देखील शिवसेना भवन बांधण्याच्या तयारीला वेग आलायं. मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही होणार शिवसेना भवन. विशेष म्हणजे पुण्याच्या अत्यंत वर्दळीच्या भागात बालगंधर्व चौकात हे शिवसेना भवन होणार आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, आणि पदाधिकारी कार्यालयाची पाहणी देखील केल्याची माहिती मिळते आहे. सध्याचं शिवसेना पक्ष कार्यालय डेक्कन परिसरात आहे.
Published on: Aug 13, 2022 01:32 PM