VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 14 February 2022
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडवला. काँग्रेसच्या आंदोलनाचा फियास्को उडाल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडवला. काँग्रेसच्या आंदोलनाचा फियास्को उडाल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करतील. पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हात जोडून आभारही मानले.