VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 14 March 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही. एसआयटीतील डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेले प्रश्न मी पाहिले नाही आणि उत्तरही पाहिलं नाही. एसआयटीतील डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. हा रुटीनचा भाग आहे. मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.