VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 14 November 2021
त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले.
त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आज परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.