VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 September 2021
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमाआहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेनेच्या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी भूमिका स्पष्ट केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमाआहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेनेच्या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी भूमिका स्पष्ट केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.