VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 18 August 2021
अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या 129 भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. ए आय 244 या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले होते. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती.
अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या 129 भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. ए आय 244 या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले होते. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं. श्वेता शंकेच्या कामगिरीचं सध्या देशात कौतुक केलं जातंय. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय.