VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 july 2022
शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीतच निवडणूक आयोगाकडे शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्याचा आणि निवडणूक चिन्ह आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात. त्यानंतर शिंदे हे मुंबईकडे आले.
शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीतच निवडणूक आयोगाकडे शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्याचा आणि निवडणूक चिन्ह आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात. त्यानंतर शिंदे हे मुंबईकडे आले. मात्र, आज शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे. या पत्रात शिंदे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे. तसेच नव्या कार्यकारिणीने निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
Published on: Jul 20, 2022 01:37 PM