VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 November 2021

| Updated on: Nov 21, 2021 | 3:05 PM

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं..? , रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले.

एसटीचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यांचे एकेकाळचे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं..? , रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 November 2021
VIDEO : Devendra Fadnavis | रझा अकादमी कोणाचं पिल्लू हे सगळ्यांना माहिती : देवेंद्र फडणवीस