VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 June 2022

| Updated on: Jun 28, 2022 | 1:55 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे. यामुळेच आता राज्यातील घडामोडींना वेग आलाय. पुढील 48 तासांत बंडखोर शिंदे हे मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज्यपालांना शिंदे गटाकडून किंवा छोट्या पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे. यामुळेच आता राज्यातील घडामोडींना वेग आलाय. पुढील 48 तासांत बंडखोर शिंदे हे मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज्यपालांना शिंदे गटाकडून किंवा छोट्या पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याचे राजकारण प्रचंड तापले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. राज्यात नेमके कोणाचे सरकार आता येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Published on: Jun 28, 2022 01:55 PM
VIDEO : Jalna | जालन्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा मोर्चा
सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत हालचाली; एकनाथ शिंदे होणार आज दिल्लीत दाखल?