VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 3 December 2021
एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यभरातील चालक, वाहक, कर्मचारी अशा एकूण 9000 कर्मचाऱ्यांचे सरकारने निलंबन केले आहे. गुरुवारीदेखील 498 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यभरातील चालक, वाहक, कर्मचारी अशा एकूण 9000 कर्मचाऱ्यांचे सरकारने निलंबन केले आहे. गुरुवारीदेखील 498 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनकरण करावे, या मागणीसाठी हा संप आहे. मात्र यामुळे लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा संप मागे न घेतल्यास कर्मचाऱ्यांवर MESMA या अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत कारवाई करावी लागेल, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला.