VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 May 2022

| Updated on: May 30, 2022 | 1:39 PM

आमचे तीन खासदार राज्यसभेत जातीलच. त्याबाबत कोणतीच झिकझिक होणार नाही. आमचे तीन खासदार होते. तिन्ही खासदार संसदेत पाठवणार आहोत. यात खरेदीविक्री, घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भाजपकडून आज धनंजय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

राज्यसभा (rajya sabha) निवडणुकीत घोडेबाजार थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट आघाडीलाच फॉर्म्युला सांगितला आहे. भाजपच्या (bjp) तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांचेही तीन उमेदवार आहेत. पण आम्ही घोडेबाजार करणार नाही. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. म्हणजे घोडेबाजारच होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितलं. आमचे तीन खासदार राज्यसभेत जातीलच. त्याबाबत कोणतीच झिकझिक होणार नाही. आमचे तीन खासदार होते. तिन्ही खासदार संसदेत पाठवणार आहोत. यात खरेदीविक्री, घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भाजपकडून आज धनंजय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच हे आवाहन केलं.

Published on: May 30, 2022 01:39 PM
VIDEO : Mumbai | Navneet Ravi Rana यांच्या घरी ऑडिट करण्यासाठी महापालिकेची टीम दाखल
VIDEO : Devendra Fadnavi | Munna Mahadik कसे जिंकणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला फॉर्मुला