VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 5 December 2021
भारतातील कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन (Satyendar Jain) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
भारतातील कोरोना विषाणूच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन (Satyendar Jain) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती 37 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात आहेत. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे. नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.