VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 5 January 2022
भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली. त्यांतर आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून उपचार सुरु केले आहेत.
भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली. त्यांतर आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून उपचार सुरु केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यांचे कुटुंबीय अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.