VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 6 July 2021

| Updated on: Jul 06, 2021 | 2:25 PM

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते.

Pratap Sarnaik | माझ्यावर घोटाळ्याचे आरोप खोटे, विधानसभेतून प्रताप सरनाईक LIVE
VIDEO : Monsoon Session | केंद्राच्या कृषी कायद्याला सरकार आव्हान देणार