4 मिनिटे VIDEO : 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 7 July 2021

| Updated on: Jul 07, 2021 | 1:59 PM

आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे.

VIDEO : Chandrashekhar Bawankule | राज्य सरकार नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे – चंद्रशेखर बावनकुळे
VIDEO : Breaking | मंत्रिमंडळ विस्ताराआधी 4 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा