VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 January 2022
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात 8 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, पंजाबमध्ये 3 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मणिपूरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात 8 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, पंजाबमध्ये 3 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मणिपूरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच यावेळी देखील फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक संपू शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. तर, उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपणार आहे. तर, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपणार आहे.