VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 September 2021
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असंही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या.