VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 9 January 2022
नाशिकमध्ये अतिशय भयंकर झपाट्याने कोरोना रुग्णात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कालच्या तुलनेत आज चक्क1 हजाराने कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 3 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
नाशिकमध्ये अतिशय भयंकर झपाट्याने कोरोना रुग्णात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कालच्या तुलनेत आज चक्क1 हजाराने कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 3 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे काल शनिवारी ही रुग्णसंख्या 2 हजार 566 होती. त्यात जवळपास हजाराने वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोरोनाचा अक्षरशः गुणाकार सुरू झाल्याचे दिसते आहे. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 428 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.