VIDOE : Headline | 10 AM | मुंबईच्या महापौरांचा जागतिक सन्मान
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता. यावेळी स्वबळाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांना चिमटे काढतानाच भाजपवरही निशाणा साधला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता. यावेळी स्वबळाची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षांना चिमटे काढतानाच भाजपवरही निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे.