VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 23 May 2022
आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज नागपुरात आहेत. राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर राहील. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज नागपुरात आहेत. राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर राहील. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. आम्ही सर्वच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
Published on: May 23, 2022 12:53 PM