VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 28 October 2021
चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पाटील हे नाव धारण करून तो परराज्यात लपत होता. हे नाव धारण करून त्याने अनेकांची फसवणूक केली. काही एनजीओचा पदाधिकारी असल्याचीही तो बतावणी करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पाटील हे नाव धारण करून तो परराज्यात लपत होता. हे नाव धारण करून त्याने अनेकांची फसवणूक केली. काही एनजीओचा पदाधिकारी असल्याचीही तो बतावणी करत होता, अशी माहिती समोर आली आहे, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. केपी गोसावीच्या मुसक्या आवळल्या नंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन गोसावीच्या चौकशीतून आलेली माहिती मीडियाला सांगितली.