VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 3 February 2022

| Updated on: Feb 03, 2022 | 12:05 PM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी भागात समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सतगुरु हॉटेलचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी भागात समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सतगुरु हॉटेलचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लवकरच कारवाई होणार आहे. राजेश नार्वेकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांचे सासरे आहेत, अर्थात राऊतांचे व्याही आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती.

VIDEO : अमरावतीत संतापजनक प्रकार, गुप्तांगातून Swab घेणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा | Amravati | Corona Test
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 February 2022