VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 30 January 2022
शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या चर्चांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेना-भाजप एकत्रं येणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका मांडली.
शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या चर्चांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेना-भाजप एकत्रं येणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक या स्तंभातून ही भूमिका स्पष्ट केली आहे.