VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 5 November 2021
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोर्टाकडून जरी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी देखील त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावेत असे आदेश त्यांना न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.