VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 8 February 2022
शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिलेल्या उत्तरावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केलाय त्याविषयी महाराष्ट्र सरकारनं बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिलेल्या उत्तरावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केलाय त्याविषयी महाराष्ट्र सरकारनं बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं. कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय. त्या महामारीचं खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सुप्रीम कोर्टानं, हाय कोर्टानं इतरांना दिले होते.